ताजी बातमी

मुंबई-ठाण्यातल्या  सुरक्षित गोविंदाची हमी देणाऱ्या गोविंदा पथकांतील एकूण ११९ गोविंदा आज दहीहंडी फोडताना जखमी झाले आहेत. जखमी गोविंदांपैकी २४ गोविंदांवर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. या गोविंदांची प्रकृती स्थिर असून आतापर्यंत २७ गोविंदांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

जखमी गोविंदापैकी केईएम रुग्णालयात १२, राजावाडी रुग्णालयात १०, नायर रुग्णालयामध्ये सहा, सायन रुग्णालयात चार, जे.जे. रुग्णालयात तीन, सेंट जॉर्जमध्ये पाच, जीटी रुग्णालयात तीन, गोवंडीच्या शताब्दीमध्ये दोन, मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात एक, कूपरमध्ये चार, ट्रॉमा केअरमध्ये तीन, व्ही.एन. देसाईमध्ये एक तर कांदिवलीच्या शताब्दीमध्ये सहा गोविंदांना उपचारासाठी आणले. एका खासगी रुग्णालयातही एक गोविंदा दाखल आहे. जे.जे.मध्ये मानसी भोईर या १७ वर्षीय महिला गोविंदाला मांडी आणि टाचेच्या दुखापतीसाठी दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार करून नंतर तिला घरी सोडण्यात आले

वरळीच्या उदय क्रीडा मंडळमधील २० वर्षीय अनिकेत सुतार या गोविंदाच्या डाव्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. ४१ वर्षीय सुनील सावंत हे श्री साई देवस्थान गोविंदा पथकातील असून यांच्या मानेला गंभीर दुखापत झाली आहे. या तिघांवरही केईएममध्ये रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. सावंत यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना इतरत्र हालवण्याची चर्चा होती, मात्र रुग्णालय प्रशासनाने याला दुजोरा दिला नाही

तर दुसरीकडे ठाण्यातल्या दहीहंडी उत्सवात पुन्हा नऊ थरांच्या विक्रमाची बरोबरी केलीय. यंदाही जय जवान गोविंदा पथकानं हा विक्रम नोंदवला आहे

 

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात