नगरसेविकेच्या दिरावर पोक्सोअंतर्गत गुन्हा
अल्पवयीन मुलीवर चार वर्षांपासून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत बलात्कार केल्याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात संदीप माळीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी माळीविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. संदीप माळी हा भाजपच्या विद्यमान नगरसेविकेचा दीर असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.
पीडित मुलीच्या आईने मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. जुलै २०१५ ते १६ ऑगस्ट २०१९ पर्यंत माळी याने रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत दमदाटी करत मुलीबरोबर वारंवार जबरी संभोग केल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या तक्रारीनंतर शनिवारी सकाळी ११.३० वाजता मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आल्यानंतर पोलिसांनी माळीला राहत्या घरातून ताब्यात घेतले असून चौकशीनंतर त्याला अटक केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.