गावाला रस्ता नसल्याने संसारमार्गात अडथळे
वैतरणा आणि विरार
स्थानकाच्या
मध्ये
एक
सागरी
बेट
आहे
या
बेटावर
वाढीव
आणि
सरावली
ही
गावे
आहेत.
ग्रुप
ग्रामपंचायतीच्या आधिपत्याखाली ही गावे
येत
असून
या
गावांची
लोकसंख्या
जवळ
जवळ
२०००
च्या
घरात
आहे.
पण
गाव
वसल्यापासून
मूलभूत
सेवा
सुविधांपासून
वंचितच
राहिली.
या
गावात
जाण्यासाठी
आजही
कोणताच
रस्ता
नाही,
यामुळे
येथील
लोकांना
ये-जा
करण्यासाठी
रोज
आपल्या
जीवाची
बाजी
लावावी
लागते.
या
गावांना
वैतरणा
खाडीवरील
४००
मीटरचा
रेल्वे
पूल
ओलांडून
ये-जा
करावी
लागते.
यामुळे
अनेकांना
आपला
जीव
गमवावा
लागला.
रेल्वे
पूल
Rमांक
९२
आणि
९३
या
पुलावरून
रोज
जीवघेणा
प्रवास
करावा
लागतो.
अशातच
गावातील
महिला,
शाळकरी
मुले,
चाकरमानी
रोज
भाकरीच्या
लढाईसाठी
जीवघेणा
प्रवास
करत
आहेत.
आतापर्यंत
शेकडो
गावकरी
या
पुलांचे
बळी
ठरले
आहेत.
पण
आजतगायत
गावासाठी
कोणतीही
सोय
प्रशासनातर्फे करण्यात आली नाही.
गावातील
समस्या
इथेच
संपत
नाहीत.
या
गावात
लोकांना
पिण्याचे
पाणी
नाही
कोणत्याही
आरोग्य
सुविधा
नाहीत,
दळणवळणाची
साधने
नाहीत,
शाळा
नाही,
विजेचा
लपंडाव
सतत
सुरू
असतो.
या
सर्व
असुविधांमुळे
महिलांना
विशेष
त्रास
सहन
करावा
लागतो.
यामुळे
येथे
लग्नासाठी
मुलगी
देण्याचे
कुणी
धाडस
करत
नाही.
गाव
सोडून
जर
कुणी
तरुण
राहायला
तयार
झाला
तरच
त्याचे
लग्न
होते.
पण
प्रपंचाची
नाळ
गावाशी
जोडली
असल्याने
आणि
आर्थिक
गणित
जुळत
नसल्याने
तरुणही
गावाबाहेर
जाऊ
शकत
नाहीत.
यामुळे
त्यांचे
लग्न
होत
नाही.
या समस्यांच्या संदर्भात गावकरी अनेक वर्षांपासून लढा देत आहेत. पण त्यांच्या पदरी केवळ अपयश पडते. तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी या गावाला भेट देऊन येथील समस्यांचे निवारण करण्याचे सांगितले होते. पण ते प्रस्तावसुद्धा धूळ खात पडले आहेत. गावकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचीसुद्धा भेट घेतली होती. पण केवळ आश्वासनाने गावकऱ्यांचे समाधान करण्यात आले.