ताजी बातमी

म्हाडामध्ये घरांच्या सोडतीसह पात्रता पडताळणी, पुनर्विकास योजना, संक्रमण शिबीर आदी विविध विभागांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. हा ताण वाढत असल्याने म्हाडाने नव्याने ६११ कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे ठरविले आहे. या मेगाभरतीस म्हाडाच्या वांद्रेतील मुख्यालयात बुधवारी पार पडलेल्या प्राधिकरण बैठकीत मंजुरी देण्यात आली.

म्हाडा अंतर्गत विविध विभागांचा समावेश असून त्यात कोकण मंडळ, गिरणी कामगारांच्या घरांसाठी पात्रता पडताळणी, पंतप्रधान निवास योजना, पुनर्वसन योजनांसह अनेक घटक येतात. या विभाग, कार्यालयीन जबाबदारींच्या तुलनेत कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी ठरते. ही कमतरता भरून काढण्यासाठी म्हाडाने बुधवारी कर्मचारी भरती प्रस्तावास मान्यता दिली. यावेळी म्हाडा अध्यक्ष उदय सामंत, सभापती मधु चव्हाण, विनोद घोसाळकर, विजय नाहटा, म्हाडा उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर आदी सदस्य उपस्थित होते.

राज्य सरकारने म्हाडास नियोजन प्राधिकरणाचा दर्जा दिल्याने प्राधिकरणावरील जबाबदारी आणखी वाढली आहे. या भरतीसाठी राज्य सरकारचे १६ टक्के मराठा आरक्षण धोरण राबविले जाणार आहे. त्यापद्धतीने बिंदूनामावलीनुसार भरती प्रक्रिया पूर्ण होईल. ही यादी अंतिम करताना कोकण मंडळाकडून कर्मचाऱ्यांच्या नावांच्या यादीची पडताळणी केली गेली आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात