ताजी बातमी

मुंबईओएलएक्ससारख्या संकेतस्थळावरील खरेदी-विक्री व्यवहाराच्या निमित्ताने ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण गेल्या काही दिवसांत अचानक वाढले आहे. फसवणूक झालेल्यांमध्ये बहुतांश गूगल पे, भारत पे ॅप वापरणारे आहेत. व्यवहार झटपट व्हावेत या उद्देशाने सुरू केलेली सोय (प्री ॅप्रुव्हल लिंक) किंवा त्याबाबतचे अज्ञान वापरकर्त्यांचा घात करते, असे सायबरतज्ज्ञांचे निरीक्षण आहे.

पवई आणि मरिन ड्राइव्ह परिसरातील तीन सुशिक्षितांना २९ जुलैला प्री ॅप्रुव्हल लिंक पाठवून फसवण्यात आले. या तिन्ही प्रकरणांत फसवणूक झालेल्यांनी आपल्या वस्तू विकण्यासाठी ओएलएक्सवर जाहिरात केली होती. त्या खरेदी करण्याच्या निमित्ताने ग्राहकांच्या वेशात भामटय़ांनी त्यांच्याशी संपर्क साधला. गूगल पे ॅप वापरता का, अशी विचारणा केली. त्यांच्या मोबाइलवर भारत पे ॅपशी संबंधित दोन लिंकही पाठवल्या. त्या उघडून पे पर्याय निवडताच तिघांच्या खात्यांतून पैसे वळते झाले. प्रत्यक्षात या तिघांना त्यांच्या वस्तू विकायच्या होत्या. त्यामुळे त्यांच्या खात्यात पैसे यायला हवे होते. मात्र पैसे खरेदी करणाऱ्यांच्याच खात्यात गेले. विशेष म्हणजे यातील दोघांनी गूगल पे ॅप वापरणाऱ्या ओळखीतल्या दोघांतर्फे हे व्यवहार केले.

सायबरतज्ज्ञ ॅड. प्रशांत माळी यांनी दिलेल्या माहितीनुसार या लिंक म्हणजे प्री ॅप्रुव्हल म्हणजेच आपल्या खात्यातून अन्य खात्यात पैसे वळवण्याची संमती असते. व्यवहार चटकन व्हावेत यासाठी संबंधित ॅप तयार करणाऱ्या कंपन्यांनी केलेली ही सोय. पण ही संमती आहे आणि या लिंकवर माहिती दिल्यास किंवा पे पर्याय निवडल्यास पैसे वळते होतात, याची माहिती वापरकर्त्यांपैकी अनेकांना नसते.

 प्रत्यक्षात एखादी वस्तू खरेदी करताना किंवा विकताना जो चोखंदळपणा, व्यावहारिकपणा असतो तोच ऑनलाइन व्यवहारांमध्येही असणे आवश्यक आहे. आर्थिक व्यवहार प्रत्यक्ष भेटून, खरेदी-विक्रीनंतर करावेत. वस्तू विकत घेणाऱ्याने लिंक पाठवल्यास त्यावर कोणतीही माहिती विशेषत: ॅपवरील खात्याचे तपशील देऊ नयेत. त्या लिंकवर पैशांची मागणी होत असेल तर हा व्यवहार टाळावा.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात