ताजी बातमी

कल्याण-ठाकुर्लीदरम्यान रेल्वेच्या मार्गाच्या दुरुस्तीची देखरेख करणारे रेल्वे इंजिनीअर विमलकुमार रॉय (४०) यांचा कल्याणकडून मुंबईकडे जाणाऱ्या लोकलच्या धडकेत मृत्यू झाला. बुधवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. 

कल्याण-ठाकुर्लीदरम्यान कामगार रेल्वे रुळांचे काम करत होते. त्यांना सूचना देत विमल रॉय हे काम करून घेत होते. संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास रॉय हे कामात व्यग्र असताना त्यांना मागून आलेल्या लोकलचा हॉर्न ऐकू आला नाही. यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरील लोकलने त्यांना धडक दिली. 

चार दिवसांपूर्वी बदलापूर वांगणी परिसरात अडकलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी चामटोली परिसरात रॉय यांनी पूर्णवेळ समन्वयाची जबाबदारी पेलली होती. त्यांच्या या कामाचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी कौतुक केले होते. अतिशय हुशार आणि मदतीला धावून जाण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे कर्मचारी त्यांच्याबरोबर काम करण्यास कायम तयार असत. जखमी रॉय यांना कामगारांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. 

                                                                   

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात