ताजी बातमी

मुंबईसह उपनगरात मध्यरात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि अरबी समुद्रातील वाऱ्यांचा वाढलेला वेग याचा परिणाम म्हणून कोकणासह मुंबई आणि परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. कल्याण, वसई विरार, नवी मुंबई, पालघर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाने हजेरी लावली आहे. पुढील दोन दिवस मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज हवान विभागाने व्यक्त केला आहेगेल्या तीन-चार दिवसांपासून पाऊस सक्रिय झाला असून राज्यात सर्वदूर पाऊस सुरू आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीत दमदार पाऊस पडत आहे. गेल्या २४ तासांत कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी, तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.

दरम्यान, महाराष्ट्रासह पंजाब, हरियाणा, दिल्ली, बिहार आणि उत्तरप्रदेशातही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात बुधवारी (३१ जुलै) आणि गुरुवारी ( ऑगस्ट) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात, तर शुक्रवारी ( ऑगस्ट) कोकणासह मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथा परिसरात अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात