ताजी बातमी

मुंबई आणि परिसरात दोन दिवसांपासून पावसाने चांगला जम बसवला असून पुढील दोन दिवस काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. शुक्रवारी २६ जुलैला मुंबईत काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच दिवशी दक्षिण आणि उत्तर कोकणातदेखील अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

२६ जुलैला मुंबईत अतिवृष्टी होणार आहे. तसेच २७ आणि २८ तारखेला जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने वर्तवला आहे. २६ जुलै २००५ या दिवशी मुंबईत पूर येऊन मोठी जीवित तसेच वित्त हानी झाली होती. गेल्या दोन दिवसांत सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पुन्हा एकदा २६ जुलै २००५ च्या कटू आठवणी ताज्या झाल्या आहेत.

२६ जुलै २००५ मध्ये मुंबईत मुसळधार पाऊस झाला होता. या पावसामुळे आलेल्या भीषण पुराने हजारहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला. या घटनेला १४ वर्षांहून अधिक काळ होऊन गेला आहे. मात्र, ती पूरग्रस्त स्थिती अद्याप अनेकांच्या डोळ्यांसमोरच आहे. मुंबई शहर तसेच उपनगरांत जोरदार पाऊस झाल्यानंतर मुंबई तुंबते. त्यामुळे आता पुन्हा २६ जुलैला मुंबईकरांची दैना होण्याची शक्यता आहे.

 

मुंबईत गेल्या ५० वर्षांत झाला नाही, एवढा विक्रमी पाऊस २६ जुलै २००५ रोजी झाला होता. त्यावेळी झालेली प्राणहानी, अपरिमित नुकसान झालेला हाहाकार याच्या आठवणी मुंबईकर अजूनही विसरलेले नाहीत. त्यावेळी उपनगरांमध्ये जलप्रपात झाला होता सांताक्रूझ येथे तब्बल ९४४ मिमी इतक्या २४ तासातील विक्रमी पावसाची नोंद झाली होती. हजारो मोटारगाडय़ांची अवस्था पाणबुडय़ांप्रमाणे झाली होती, असंख्य इमारतींचे तळमजले पाण्याखाली गेले होते हजारो झोपडय़ा उद्ध्वस्त झाल्या होत्या. मिठी नदीला महापूर आला प्रचंड हानी झाली होती.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात