अंधेरी उड्डाणपूलावर अपघात, तीन गाडयांच्या धडकेत ८ जण जखमी
मुंबईत अंधेरी उड्डाणपूलावर बुधवारी पहाटेच्या सुमारास अपघात झाला. तीन कार परस्परांवर आदळल्या. या अपघातात आठ जण जखमी झाले आहेत. मुसळधार पावसामुळे दृश्यमानता कमी असल्यामुळे हा अपघात घडला.
मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक भागात पाणी साचले आहे. सायनमध्येही रेल्वे रुळ पाण्याखाली गेले आहेत. हवामान खात्याने शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.