मुंब्रा येथून गुटख्याचा साठा जप्त
गुटख्यावर बंदी
असूनही तस्करी थांबलेली नाही. ठाणे अंमली पदार्थविरोधी पथकाने मुंब्र्यात कारवाई करत अडीच लाखांचा गुटख्याचा साठा हस्तगत करून मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंब्रा कौसा
येथील आर. के. नगर भागात गुटख्याची साठवणूक आणि विक्री करण्यात येत असल्याची माहिती एका दक्ष नागरिकाने ठाणे अंमली पदार्थविरोधी पथकाला दिली होती. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत या माहितीची खातरजमा केली. शकील अहमद साजिद अहमद शेख हा चालवत असलेल्या गाळ्यामध्ये गुटख्याचा साठा मिळून आला. या गुटख्याबाबत पोलिस तपास करत आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय पोवार यांच्या पथकाने केली आहे.
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.