उघड्यावरील विद्युत वायरचा शॉक लागून पादचाऱ्याचा मृत्यू .
नवी मुंबई - सायन-पनवेल मार्गावर सानपाडा येथे उघड्यावरील विद्युत वायरचा शॉक लागून पादचाऱ्याच्या मृत्यूची घटना घडली आहे. रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. पुलावरील विद्युत वायर तुटून पदपथावर पडलेली असल्याने घडला प्रकारचं म्हटलं जातंय. सुरेश जुनघरे असे मृत व्यक्तीचे नाव असून, ते कोपर खैरणेचे येथे राहणारे आहेत. सानपाडा रेल्वे स्थानकासमोर सायन-पनवेल मार्गाच्या दिशेने पायी चालले होते. यावेळी रस्त्यावर काही ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे दुभाजकावरून चालत असताना त्या ठिकाणी पाण्यात उघड्यावर पडलेल्या विद्युत वायरचा त्यांना शॉक लागला. यावेळी त्यांना रुग्णालयात दाखल केले असता पहाटेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. संबंधित दोषी पीडब्ल्यूडी तसेच ठेकेदारावर कारवाईची मृताच्या नातेवाईकांची मागणी केली आहे. मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला आहे. वाशीतील पालिका रुग्णालयात नातेवाईकांचा जमाव जमला आहे.