ताजी बातमी

मुंबईत सोमवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुलुंडमध्ये संरक्षक भिंत कोसळून एक जण ठार झाला. करी सिंग (४५) असे मृताचे नाव असून तो सुरक्षारक्षक म्हणून काम करीत होता. याप्रकरणी मुलुंड पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मुलुंड पश्चिमेकडील फाल्गुनी गृहनिर्माण सोसायटीमध्ये करी सिंग सुरक्षारक्षक होता. सोमवारी रात्री तो ड्युटीवर होता. मुसळधार पावसात ड्युटी बजावत असताना रात्री अकराच्या सुमारास सोसायटीची संरक्षक भिंत कोसळली. करी सिंग भितींच्या ढिगाऱ्याखाली अडकला. स्थानिकांनी पोलिस आणि अग्निशमन जवानांच्या मदतीने बाहेर काढले आणि मुलुंड रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात