कळव्यात एकाची हत्या
कौटुंबिक वादविवादाबाबत बोलण्यासाठी गेलेल्या रमेश चौहान याची चाकूने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना शनिवारी कळव्यामध्ये घडली आहे.
या प्रकरणी जरीना, फिरोज शेख, महेश गुप्ता, अमिन शेख, अब्दुल शेख यांच्याविरुद्ध कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. मृत व्यक्तीचे मागील वर्षीच लग्न झाले होते. या हत्येच्या घटनेने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिस आरोपींकडे अधिक चौकशी आणि तपास करत असल्याचे सांगण्यात आले.
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.