ताजी बातमी

. पुणे :  पुण्यातील कोंढवा बुद्रुक परिसरात इमारतीची संरक्षक भिंत कोसळून १७ मजुरांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन चिमुरड्यांचा समावेश आहेकोंढव्यात तालाब कंपनीसमोर सिमाभिंत लेबर कँम्पवर ही संरक्षक भिंत कोसळली. या दुर्घटनेत १६ मजुरांचा जागीच मृत्यू झालारात्री दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. ढिगाऱ्याखालून तिघांना जिवंत काढण्यात यश आले आहे. अद्याप बचावकार्य सुरू आहे. एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काहीजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

१६ मजुरांवर झोपेतच काळाने घाला घातल्याची घटना घडली. कोंढवा बुद्रुक परिसरात आल्कन स्टायलिश इमारतीची संरक्षक भिंत मजुरांच्या तात्पुरत्या बांधलेल्या पत्र्याच्या खोल्यांवर कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला. ही भिंत मोठी असल्यानं आणि कामगारांच्या खोल्या खड्ड्यात असल्याने मोठ्या प्रमाणात भिंतीचा ढिगारा घटनास्थळी पडलामृतांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहेजखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्येही मुलांचा समावेश आहे. या भिंतीला लागून मजुरांच्या कच्च्या झोपड्या होत्या. मुसळधार पावसामुळे भिंत कोसळल्याने ही दुर्घटना घडली



सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात