ताजी बातमी

मुंबईमुंबईतील आरसीएफ वसाहतीत 23 नागांच्या पिलांचा जन्म झाला आहे. आरसीएफ वसाहतीत नागाची अंडी सापडली होती. त्यातूनच या पिल्लांनी जन्म घेतला आहे. पावसाळा सुरू झाला की साप आपल्या पिल्लाना जन्म देतो. जंगलांची कमी होत जाणारी संख्या, मोठ्या प्रमाणात होत असलेले बांधकाम यामुळे वन्य जीवांच्या अस्तित्वाचा प्रश्न झाला आहे. नागाची अंडी सर्पमित्रांना सापडल्याने नागांना जीवनदान मिळाले आहे

मुंबईच्या आरसीएफ कॉलनीत एका ठिकाणी अंडी असल्याची माहीती सर्पमित्र सुनील कदम यांना कळवण्यात आली. यावर सर्पमित्र सुनील यांनी ही अंडी ताब्यात घेत डब्यात ठेवली होती.ज्या डब्यात अंडी ठेवली होती त्यातून दुसऱ्या दिवशी सकाळी नागाच्या पिल्लांनी जन्म घेतला आहे. नाग किंवा इतर सरपटणारे प्राणी मानवी वस्तीत सापडत असून त्यांना जीवनदान दिले तरच निसर्गचक्र पूर्ण होणार असल्याचे मत सर्पमित्र सुनील यांनी यावेळी व्यक्त केले.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात