ताजी बातमी

मुंबई: घाटकोपर पश्चिम येथील भटवाडीमधील सार्वजनिक शौचालय बिल्डरच्या फायद्यासाठी तोडले जात आहे. यामुळे येथील राहिवाशांना त्रास होणार असल्याने शौचालय तोडू नये, या मागणीसाठी घाटकोपर पश्चिम येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुदाम शिंदे यांनी गुरुवारी आत्मदहनाचा प्रयत्न केला

घाटकोपर पश्चिम भटवाडी येथील राम जोशी मार्ग येथे माता महाकाली सेवा मंडळ या ठिकाणी सरकारी मालकीच्या जागेवर ३८ आसनी शौचालय आहे. त्याचा वापर येथील एक हजार ते दीड हजार नागरिक या शौचालयाचा वापर करतात. अशावेळी हे शौचालय तोडल्यास विभागातील नागरिकांना पर्याय सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होईल.

विभागातील लोकसंख्या बघितली असता आहे ते शौचालय नागरिकांना अपुरे पडते. या संदर्भात चार वर्षापासून उपोषण, धरणे आंदोलन, मोर्चा या लोकशाही पद्धतीने आंदोलन करूनही महानगरपालिका अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहे, अशी तक्रार सुदाम शिंदे यांनी केली.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात