ताजी बातमी

नवी मुंबई वाहतूक विभागाच्या (आरटीओच्या) कृपा आशीर्वादाने सध्या जेएनपीटी बंदराच्या परिसरातील रस्त्यांवर एकाच नंबरच्या गाड्या राजरोसपणे धावत असल्याचे चित्र सर्रास पाहावयास मिळत आहे. त्यामुळे भविष्यात अशा बनावट नंबर परिधान केलेल्या गाड्यांमुळे जेएनपीटीसारख्या महत्वाच्या बंदरात विघातक कृत्य होण्याची भीती बळावली आहे.

वाहतूक विभागाच्या (आरटीओच्या) कृपेने जेएनपीटी मधील डि.पी.वल्ड (एन.एस.आय.सी.टी.न्हावाशेवा ) या खासगी बंदरात एम.एच.46 बी.एफ.-5409 या एकाच नंबरच्या दोन गाड्या जेएनपीटी बंदर परिसरात धावत असल्याचे पाहावयास मिळत आहे. यासंदर्भात न्हावा-शेवा वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी महावीर जाधव यांना विचारणा केली असता त्यांनी या गाड्यांसंदर्भात माहिती नसल्याचे सांगितले. तसेच एकाच नंबरच्या गाड्या असतील तर ती माहिती आर.टी. कडून मिळणार असे सांगितले. तर आर.टी. कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्या कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही. एकंदरीत वाहतूक शाखेच्या अशा भोंगळ कारभारामुळे देशाची सुरक्षा धोक्यात येणार असं चित्र निर्माण झालं आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात