Amrish Puri : गुगलही झाले 'मोगॅम्बो'वर खुश
मोगॅम्बो खुश हुवा! म्हटले की डोळ्यासमोर अमरिश पुरी यांचेच नाव समोर येते. वैविध्यपूर्ण भूमिका साकरणारे अमरिश पुरी यांचा आज जन्मदिवस म्हणजे जयंती आहे. अमरिश पुरी यांचा पाहाडी आवाज त्यांची ओळख होती. अमरीश पुरी आज आपल्यात नसले तरी त्यांचे डायलॉग आजही जिवंत आहेत. मग तो दामिनी या गाजलेला चित्रपटातील बॅरिस्टर इंदरजीत चढ्ढा तर नागिन चित्रपटातील भैरवनाथ असेल किंवा तहलका चित्रपटातील जनरल डाँग असो. प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. गुगलने बॉलिवूडच्या 'मोगॅम्बो'ला म्हणजे महान अभिनेते अमरिश पुरी यांच्या जयंतीनिमित्त खास डुडल तयार केले आहे.
कोणताही चित्रपट म्हटले चर्चा होते ती अभिनेता आणि अभिनेत्रीची. पण एक काळ असा होता की चर्चा व्हायची ती चित्रपटातील खलनायकाची. ज्याप्रमाणे प्राण, रंजीत यांनी खलनायक म्हणून चित्रपट क्षेत्तात नाव कमावले त्यापैकी एक नाव अमरिश पुरी यांचे देखील आहे. १९६७ ते २००५ अशी मोठी कारकीर्द त्यांनी चित्रपटसृष्टीत गाजवली. खलनायकाच्या भूमिकेला त्यांच्यामुळे एक वेगळे वलय प्राप्त झाले. त्यांची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या मनावर बिंबली आहे. गुगलकडून आज अमरिश पुरी यांनी डुडलरुपी मानवंदना देण्यात आली आहे. त्यामुळे गुगलही आज बॉलिवूडच्या 'मोगॅम्बो'वर खुश झाले आहे असे म्हटले तर वावगे वाटायला नको.