ताजी बातमी

सुरक्षेसाठी आजची रात्र बाहेर काढा, अन्यथा पाऊस जास्त पडला तर काही खरे नाही’, अशी धोक्याची सूचना मालाड पूर्वच्या एसआरए इमारतीमधील रहिवाशांना अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. या इमारतीच्या शेजारीच खासगी विकासकाकडून नवीन टॉवरसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यामुळे अवघ्या दोन वर्षांपूर्वी ताबा मिळलेली सात मजली इमारत कधीही ढासळू शकते. मात्र पर्यायी व्यवस्था नसल्यानेघरे रिकामी करा, अथवा मराअशी वेळ स्थानिकांवर आली आहे.

मालाड पूर्वच्या कुरार व्हिलेज येथील शिवाजीनगरमध्ये ब्रह्मा विष्णू महेश को-आॅपरेटिव्ह सोसायटी आहे. या सात मजली इमारतीचा ताबा गेल्या दोन वर्षांपूर्वीच रहिवाशांना मिळाला असून एकूण १३९ कुटुंबे या इमारतीत राहतात.  शुक्रवारी रात्री साडेबाराच्या सुमारास अग्निशमन दलाचे जवान त्यांच्या घरी आले आणि इमारतीमधून बाहेर पडा, असे सांगू लागलेपाऊस जास्त पडला तर जीवितहानी होण्याची शक्यता त्यांनी वर्तविली.

या इमारतीच्या शेजारीच एका टॉवरचे काम सुरू असून त्यासाठी चार ते पाच पोकलेन राहतील इतका मोठा खड्डा खणण्यात आला. तो इमारतीच्या अगदी बाजूला असल्याने त्यात माती ढासळत असून संबंधित एसआरए इमारतीचा पाया कमकुवत होत चालला आहे.
परिणामी कधीही इमारत ढासळून मोठी जीवितहानी होण्याची भीती स्थनिकांना सतावत असून त्यांची झोप उडाली आहे. या प्रकरणी संबंधित यंत्रणांनी लक्ष घालत योग्य त्या उपाययोजना करण्याची विनंती रहिवाशांनी केली आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात