पत्नीला रिव्हॉल्व्हरने मारहाण; पतीस अटक
पहिल्या लग्नाचा घटस्फोट झालेला नसतानाही दुसऱ्या मुलीशी अनैतिक संबंध ठेवल्याचा जाब विचारणाºया पत्नीलाच चामडी
पट्ट्याने बेदम मारहाण करुन रिव्हॉल्व्हरने गोळी घालण्याची धमकी देणाºया भान चंद
(३६) या पतीला कासारवडवली
पोलिसांनी गुरुवारी अटक केली. त्याला १७ जूनपर्यंत पोलीस
कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
प्रियंका (३६) आणि
भान
हे
दोघेही
ठाण्यातील
एकाच
कंपनीत
नोकरीला
असल्यामुळे
त्यांचा
२००८
मध्ये
आंतरजातीय
प्रेमविवाह
झाला
होता.
तो
मूळचा
गढवाल,
उत्तराखंडचा,
तर
ती
खेड,
रत्नागिरी
येथील
रहिवासी
आहे.
त्यांना
दहा
आणि
पाच
वर्षांची
दोन
मुलेही
आहेत.
गेल्या
काही
दिवसांपासून
तो
तिच्याशी
क्षुल्लक
कारणावरुन
भांडण
करीत
होता.
पण
ती
त्याकडे
दुर्लक्ष
करीत
होती.
अलिकडे
त्याचे
पुन्हा
त्याच्याच
कंपनीतील
त्याच्याच
जातीच्या
अन्य
एका
तरुणीशी
प्रेमसंबंध
सुरु
असल्याची
कुणकुण
तिला
लागली.
त्याबाबत
तिने
विचारणा
केल्यावर
त्याने
‘मैने
शादी
किया
है
उनसे’
असे
म्हणत
तिलाच
शिवीगाळ
आणि
मारहाण
करण्यास
सुरुवात
केली.
५
जून
२०१९
रोजी
ती
अंधेरी
येथील
तिच्या
माहेरी
मुलांसह
निघून
गेली.
तरीही
त्याने
बघून
घेण्याची
धमकी
देत
तिला
पुन्हा
येण्यास
बजावले.
१२
जून
रोजी
ती
पुन्हा
ठाण्यातील
घोडबंदर
रोड
येथील
पतीच्या
घरी
गेली.
तेव्हा
त्यांच्यात
अनैतिक
संबंधावरुन
पुन्हा
वाद
झाला.
या
वादातूनच
त्याने
चामडी
पट्ट्याने
तिला
पाठीवर,
हातावर
जबर
मारहाण
केली.
तिने
प्रतिकार
केल्यानंतर
त्याच्याकडील
रिव्हॉल्व्हर
तिच्या
कानाजवळ
लावून
ठार
मारण्याची
धमकीही
त्याने
दिली.
त्यानंतर
रिव्हॉल्व्हरच्या मागील दस्त्याने तिच्या
डोळ्याच्या
मागील
बाजूला
जखमी
केले.
या
सर्व
प्रकाराला
कंटाळून
तिने
अखेर
याप्रकरणी
१३
जून
रोजी
कासारवडवली
पोलीस
ठाण्यात
पतीविरुद्ध
तक्रार
दाखल
केली.