गाडीचा एसी सुरु करून घेतलेली विश्रांती जिवावर, गुदमरुन मृत्यू
मुंबई : गाडीचा एसी सुरू करून घेतलेली क्षणभर विश्रांती जिवावर बेतू शकते. सावधान, कारमध्ये एसी लावून झोपताय?, एसी लावून झोपणं जिवावर बेतू शकते. अशी घटना ही विक्रोळीत घडली आहे. कारमध्ये गुदमरून एकाचा मृत्यू झाला. विक्रोळीत गाडीत एसी सुरु करुन सुरेश डबडे यांनी विश्रांती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा गुदमरल्यामुळे मृत्यू झाला. त्यामुळे एसी सुरु करुन कारमध्ये झोपणे धोकादायक आहे.
मुंबईतील विक्रोळी पार्कसाईट परिसरातील वीर सावरकर मार्गावर उभ्या असलेल्या एका कारमध्ये चालकाचा मृतदेह आढळला. गाडीचा एसी चालू ठेवून झोपल्याने गुदमरून त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुरेश डबरे असे या कारचालकाचे नाव आहे. दोन दिवसांपासून ते घरी गेले नव्हते. कारमधून दुर्गंधी येत असल्याचे काही नागरिकांना आढळले. पाहणी केल्यानंतर कारचालक मृतावस्थेत आढळला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला, अशी माहिती पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी दिली.