प्रियकराच्या मदतीने विवाहित महिलाने रचला स्वत:च्या बनावट मृत्यूचा कट
विवाहित महिलेने प्रियकराच्या मदतीने मैत्रिणीची निर्घृण हत्या केली. नंतर स्वत:चे कपडे, चप्पल आणि दागिने तिच्या अंगावर चढवून स्वत:च्या बनावट मृत्यूचा कट रचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी सांगितले की, मुख्य आरोपी सोनाली शिंदे (वय-26) हिचे दुसरा आरोपी छब्बादास वैष्णव याच्याशी प्रेमसंबंध सुरु आहे. सोनालीचा प्रियकरासोबत पळून जाण्याचा प्लान होता. परंतु, पळून गेल्यानंतर आपला कोणीही शोध घेऊ नये, असे सोनालीची इच्छा होती. यासाठी सोनालीने प्रियकराच्या मदतीने मैत्रीण रुक्मिणी माळी हिची हत्या केली. सोनाली आणि रुक्मिणी या दोन्ही शरीरयष्टीने सारख्याच होत्या. हत्येनंतर सोनालीने स्वत:चे कपडे, चप्पल आणि दागिने रुक्मिणीच्या अंगावर चढवले आणि स्वत:च्या बनावट मृत्यूचा कट रचला.