मुंबईतल्या सागरकिनाऱ्यांवरही जगतात दुर्मिळ जीव World Ocean Day
८ जून हा दिवस जागतिक सागर दिन म्हणून साजरा केला जातोय. मुंबईतील सागरी किनाऱ्यांवर असंख्य सागरी जीव तग धरुन आहेत. इथले समुद्रकिनारे या जीवसृष्टीसाठी पोषक नसले तरीही परिस्थितीशी जुळवून घेत ते आपली वाढ करत आहेत. मानवी हस्तक्षेप, सांडपाणी, प्लास्टिक कचरा, अशा विविध कारणांमुळे मुंबईचा समुद्रकिनारा प्रदूषित होत आहे. याचा परिणाम सागरी जिवांवर होतोय. साधारण ७० टक्के प्राणवायू हा समुद्रातून येतो. त्यामुळे समुद्र वाचवणं गरजेचं आहे. म्हणून समुद्र किनाऱ्यांवरची शहरं आणि गावांत राहणाऱ्यांना सागरी जिवांविषयी माहिती असणं गरजेचं आहे. यासाठी 'मरीन लाईफ ऑफ मुंबई' गेल्या दोन वर्षांपासून पर्यटकांना सागरी जिवांची सफर घडवत आहे. त्यामुळे पर्यटकांमध्ये जनजागृती होऊ लागली आहे.
आपल्या मुंबईच्या किनाऱ्यांवर चांगली जैवविविधता आहे हे लोकांना कळायला हवं, हा मरिन लाईफ ऑफ मुंबईचा उद्देश आहे, असं मरिन लाईफ ऑफ मुंबईचे संस्थापक प्रदीप पाताडे म्हणतात. तर किनाऱ्यांचे महत्त्व लक्षात घेऊन विकासाचा विचार केला तरच किनारे सुरक्षित राहतील, असं समुद्र विज्ञान अभ्यासक अभिषेक साटम यांचं म्हणणं आहे.