ठाणे: कॅसल ब्रिजवरून कोसळून दुचाकीस्वार ठार
ठाण्यातील कॅसल ब्रिजवरून कोसळून एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या या दुचाकीस्वाराची ओळख पटलेली नसून, पोलीस नातेवाईकांचा शोध घेत आहेत.
ठाण्याच्या कॅसल ब्रिजवरून हा दुचाकीस्वार नेमका कशामुळे कोसळला याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, हा दुचाकीस्वार खाली कोसळताना तो डोक्यावर आदळल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात. दुचाकीस्वाराच्या डोक्याला जबर मार बसल्यानेच त्याचा मृत्यू ओढवल्याचे सांगितले जात आहे. या दुचाकीस्वाराने हेल्मेट घातले होते का, या बाबतही माहिती मिळू शकलेली नाही.
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.