ताजी बातमी

प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरात रविवारी दुपारी सव्वा दोन ते अडीचच्या दरम्यान शॉर्टसर्किट होऊन आग लागली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. रविवारी दुपारी अश्रूंची झाली फुले या नाटकाचा प्रयोग रवींद्रमध्ये होणार होता. या नाटकाच्या सेटचे काम सुरू असताना अचानक आग लागली.

रवींद्रच्या पहिल्या मजल्यावर इलेक्ट्रिक रूममध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली. त्यानंतर विद्युतपुरवठा खंडीत झाला. ही आग प्रत्यक्ष नाट्यगृहात लागली नसली तरी आलेल्या प्रेक्षकांच्या आणि नाट्यकर्मींच्या सुरक्षेसाठी हा प्रयोग रद्द केल्याची माहिती निर्माते दिनेश पेडणेकर यांनी दिली. तर, आग लागल्याचे वेळेत कळल्याने कोणालाही इजा झाली नाही तसेच सेटही वाचला, अशी माहिती अभिनेते सुबोध भावे यांनी दिली. या नाटकाचे केवळ ५१ प्रयोग होणार आहेत. रविवारचा प्रयोग हाऊसफुल्ल होता. यापुढील सर्व रविवारी प्रयोग सादर होणार आहेत. त्यामुळे सध्या तरी लगेच रवींद्रला या नाटकाचा प्रयोग होणे कठीण आहे. त्यामुळे या तिकिटाचे पैसे परत घेऊन जाण्याचा पर्याय प्रेक्षकांसमोर ठेवण्यात येणार आहे. मात्र रवींद्रला प्रयोग करण्याचा प्रयत्न होईल.

 

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात