ताजी बातमी

आरे कॉलनीमध्ये ड्रग्ज विकण्यासाठी आलेल्या चार नायजेरियन तस्करांना पोलिसांनी रविवारी पाठलाग करून पकडले. या चौघांकडून पोलिसांनी अडीच लाखांचे कोकेन हस्तगत केले आहे. त्यांनी हे ड्रग्ज आणले कुठून आणि कुणाला विकण्यासाठी आले होते, याबाबत तपास सुरू आहे. पोलिस उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली कांदिवली युनिटचे पोलिस निरीक्षक प्रवीण कदम, सहायक निरीक्षक सावंत यांच्या पथकाची गस्त सुरू असताना आरे मार्गावरून एका टॅक्सीतून चार नायजेरियन जाताना दिसले. आरे मार्गावर पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. पळून जाण्याच्या बेतात असलेल्या पॉल ओसीनाकाची, ओकीचीकू ओबोन्ना, गॉडस्वील चिताची, रूबेन गॉडवीन या चौघांना ताब्यात घेतले.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात