ताजी बातमी

महापालिका आणि हवाई दलाने लोहगाव विमानतळ आणि राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) सुरक्षिततेच्या कारणास्तव शहरातील अकरा मजल्यांपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींसाठी भौगोलिक उंचीचे प्रमाणपत्र घेणे बंधनकारक केले आहे. मात्र, प्रमाणपत्र देणारी यंत्रणा अत्यंत कुचकामी असल्याने पालिका प्रशासनाकडे बांधकामास परवानगी मिळावी म्हणून अनेक प्रस्ताव प्रलंबित आहेत. त्यामुळे या प्रमाणपत्रांचे वितरण पालिकेकडून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, बांधकाम विभागाने तसा प्रस्तावही पालिका आयुक्तांना सादर केला आहे. 
भौगोलिक उंचीचे प्रमाणपत्र पालिकेच्या बांधकाम विभागानेच द्यावे, असे आदेश पालिका आयुक्त सौरभ राव यांनी संबंधितांना दिल्याची माहिती आमदार मेधा कुलकर्णी यांनी दिली आहे. भौगोलिक उंचीच्या प्रमाणपत्रामुळे बांधकाम व्यावसायिकांसह नागरिकांची होत असलेली अडचण लक्षात घेता कुलकर्णी यांनी राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. प्रमाणपत्र देण्याचे अधिकार पालिकेच्या इंजिनीअर्सना मिळाल्याने नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचा दावाही कुलकर्णी यांनी केला आहे. 

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात