ताजी बातमी

मुंबई पोलिसांनी आरे येथील तबेल्यात आणि नंतर नाशिकच्या दिंडोरीमध्ये छापा टाकून कोट्यवधी रुपयांचे क्लोरल हायड्रेट हे विषारी रसायन हस्तगत केले. याप्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीतून केवळ मुंबई आणि महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातील ताडीमाडी विक्री केंद्रामध्ये या विषारी रासायनीची पावडर मिसळली जात असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. यामागे मोठी साखळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जात असून आता राज्यातील सर्व ताडीमाडी विक्री केंद्रांचा पंचनामा करण्यात येणार आहे.

शासनाने बंदी घातलेले क्लोरल हायट्रेड हे विषारी रासायन ताडीमध्ये मिसळले जात असल्याची माहिती खार पोलिस ठाण्याचे निरीक्षक दया नायक यांना मिळाली. आरे पोलिसांच्या मदतीने गेल्या आठवड्यात येथील तबेल्यामध्ये छापा टाकला. त्यावेळी सुमारे २१८४ किलो क्लोरल हायट्रेड सापडले. याप्रकरणी बुनियाद अन्सारी, व्यंकटा रामण्णया करबुजा, राजन्ना बूसरपू यांना अटक करण्यात आली. चौकशीमध्ये या तिघांना मालाड येथील पप्पू उर्फ प्रकाश गोपवाणी हा हे रसायन पुरवित असल्याचे समजले. मात्र पोलिसांच्या कारवाईमुळे पप्पू फरार झाला होता. दया नायक यांच्या पथकाने माग काढत त्याच्या मुसक्या आवळल्या. नाशिकच्या दिंडोरीतील एका फॅक्टरीमधून ही पावडर संपूर्ण देशातील ताडीमाडी विक्री केंद्रात पुरवली जात असल्याचे पप्पू याने चौकशीत सांगितले. १० मे रोजी पोलिसांनी दिंडोरी येथील फॅक्टरीमध्ये छापा टाकून आणखी लाखो रुपयांचा क्लोरल हायड्रेटचा साठा जप्त करून आणखी एकाला अटक केली.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात