ताजी बातमी

आयआयटी, केईएम, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विविध सर्वेक्षणांमध्ये माहुलमध्ये सर्वसामान्यांना होणाऱ्या गंभीर आजाराचे कारण हे प्रदूषण असल्याचे वारंवार अधोरेखित झाले आहे. पालिका आणि एम प्रभागातील माहितीच्या अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीमध्ये सन २०१३ ते जानेवारी, २०१९ या सहा वर्षांत शंभर जणांचा मृत्यू हा प्रदूषणामुळे निर्माण होणाऱ्या विविध प्रकारच्या आजारांनी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये २० वर्षांखालील तसेच ६० वर्षांच्या आतील व्यक्तींचाही यामध्ये समावेश आहे

माहुलमध्ये पुनर्वसन झाल्यानंतर दोन ते तीन महिन्यांत अनेकांना श्वसनाचे आजार सुरू झाले आहेत. येथील व्यक्तींच्या मृत्यूमागील वैद्यकीय कारणांचा शोध घेतला असता यामध्ये प्रामुख्याने श्वसनाचे विकार, पक्षाघात, हृदय बंद पडणे, श्वास घेताना त्रास होणे, शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होणे अशा विविध प्रकारच्या तक्रारी आहेत. उच्चरक्तदाब, क्षयरोग, कॅन्सर तसेच हार्ट अॅटॅकमुळेही मृत्यू ओढवले आहेत. येथील दूषित पाणी प्यायल्यामुळे पोटाची दुखणी बळावून त्यातून प्रकृती खालावत गेलेल्या रुग्णांचीही यात नोंद आहे. स्त्री आणि पुरुष या दोघांचे प्रमाण पाहिल्यास त्यामध्ये चाळीस ते साठ वर्षांतील ३६ महिलांचा समावेश असून, इतर पुरुष आहेत. क्षयरोग तसेच प्रदूषणामुळे त्वचाविकार होण्याचे प्रमाणही वाढीस लागलेले आहे

 

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात