ताजी बातमी

मेट्रो प्रकल्पांसह शिवडी-न्हावाशेवा ट्रान्स हार्बर लिंक, विरार-अलिबाग कॉरिडोर, मुंबई नागरी परिवहन विकास यांसारख्या प्रकल्पांना चालू वर्षात आणखी गती मिळणार आहे. यामध्ये मेट्रोच्या किमान दोन प्रकल्पांची कामे ८० ते ९० टक्के पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. या प्रकल्पांवर एमएमआरडीए जवळपास १६ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.

दहिसर ते डी. एन. नगर, अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व, वडाळा घाटकोपर ठाणे कासारवडवली या मेट्रो मार्गांची कामे सुरू झाली आहेत. तर, स्वामी समर्थ नगर जोगेश्वरी ते विक्रोळी, डी. एन. नगर ते मंडाळा, ठाणे-भिवंडी-कल्याण, गायमुख-शिवाजी-चौक-मिरा रोड, वडाळा ते सीएसटी कल्याण-डोंबिवली ते तळोजा या प्रकल्पांच्या कामांचा यावर्षी शुभारंभ होईल. त्यादृष्टीने एमएमआरडीएने निधीचे नियोजन केले आहे. प्रकल्पांच्या प्राधान्यक्रमानुसार निधीवाटप निश्चित करण्यात आले आहे. शिवडी-न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पासाठी सर्वाधिक म्हणजे तीन हजार कोटी रु. निधी खर्च केला जाणार आहे. त्यानंतर अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व, दहिसर ते डी. एन. नगर या प्रकल्पांसाठी दीड हजार कोटींपेक्षा जास्त रकमेची तरतूद करण्यात आली आहे. बहुउद्देशीय विरार-अलिबाग कॉरिडोरसाठी २२५० कोटी रु.च्या निधीची तरतूद केली आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात