ताजी बातमी

त्या गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने प्रवाशांच्या मदतीसाठी एसटी धावली आहे. कोकणवासींसह राज्यातील नागरिकांना दिलासा देत एसटी महामंडळ भाविकांच्या सोयीसाठी आपल्या ताफ्यात नवीन ४०० शिवशाही दाखल करणार आहेत. विशेष म्हणजे शिवशाहीच्या 

सद्यस्थितीतील अडचणींवर मात्र करण्यासाठी गाड्यांच्या चेसिस इंजिनमध्ये देखील बदल करण्यात येणार आहेत.

गणेशोत्सवात कोकणासह राज्यभरात मोठ्या संख्येने भाविक प्रवास करतात. या काळात अनधिकृत टप्पा वाहतूक करणारे तसेच खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लूटमार केली जाते. हे प्रकार थांबवण्यासाठी अधिकाधिक एसटी फेऱ्या चालवण्याचे नियोजन महामंडळाने केले आहे. खासगी ट्रॅव्हल्सना टक्कर देण्यासाठी महामंडळ स्वमालकीच्या वातानुकूलित शिवशाही बांधणार आहे. घाट मार्गावर एसी बंद पडणे, दोन आसनांमध्ये जागा कमी असणे, चार्जिक पॉइंट कार्यरत नसणे या आणि अन्य समस्या 'शिवशाही'मध्ये प्रवाशांना भेडसावतात. या तक्रारींबाबत संबंधित कंत्राटदारांना महामंडळाने कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. या तक्रारी सोडवण्यासाठी महामंडळाने ४०० 'शिवशाही'च्या चेसिसमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर इंजिनची क्षमता वाढवण्यासाठी २५० अश्वशक्तीचे इंजिन बसवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती एसटीच्या अधिकृत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात