नौदलाचे सामर्थ्य वाढणार
फ्रेंच तंत्रज्ञानाच्या साह्याने तयार होणारी स्कॉर्पिअन श्रेणीतील चौथी पाणबुडी समुद्रात झेपावण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘आयएनएस वेला’ नाव असलेल्या या पाणबुडीचे आज, सोमवारी येथील माझगाव बंदराजवळ जलावतरण होत आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड या सरकारी कंपनीने वेळेआधीच या पाणबुडीची
भारतीय नौदलाच्या ताफ्यातील शिशुमार श्रेणीतील पाणबुड्यांची जागा सहा स्कॉर्पिअन पाणबुड्या घेणार आहेत. तसा निर्णय सन २००५मध्ये केंद्र सरकारने घेतला होता. या श्रेणीतील ‘आयएनएस कलवरी’ या पहिल्या पाणबुडीची समुद्री चाचणी (जलावतरण) २७ ऑक्टोबर, २०१५ रोजी झाली होती. ही पाणबुडी १४ डिसेंबर, २०१७ रोजी नौदलाच्या ताफ्यात आली. ती अत्याधुनिक असल्यानेच पुलवामा हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नौदलाने हीच पाणबुडी पाकिस्तानच्या समुद्री सीमेजवळ गस्तीसाठी तैनात केली होती. याखेरीज या श्रेणीतील 'आयएनएस खंदेरी'चे १२ जानेवारी, २०१७ रोजी तर ‘आयएनएस करंज’चे ३१ जानेवारी, २०१८ रोजी जलावतरण झाले. या दोन्ही पाणबुड्यांची समुद्री चाचणी अंतिम टप्प्यात आहे. यानंतर आता चौथ्या पाणबुडीची बांधणी पूर्ण झाली आहे.