एमएमआरडीएला हवेत १६ हजार कोटी
अनेक मेट्रो प्रकल्पांसह शिवडी - न्हावाशेवा ट्रान्स हार्बर लिंक, विरार - अलिबाग कॉरिडॉर, मुंबई नागरी परिवहन विकास यांसारख्या प्रकल्पांना चालू वर्षात आणखी गती मिळणार आहे. यामध्ये मेट्रोच्या किमान दोन प्रकल्पांची कामे ८० ते ९० टक्के पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे एकूणच सर्व प्रकल्पांचा आवाका पाहता यंदाच्या वर्षी एमएमआरडीए प्रकल्पांवर जवळपास १६ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. दहिसर ते डी.एन. नगर, अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व, वडाळा घाटकोपर ठाणे कासारवडवली या मेट्रो मार्गांची प्रत्यक्ष कामे सुरू झाली आहेत. तर, स्वामी समर्थ नगर जोगेश्वरी ते विक्रोळी, डी.एन.नगर ते मंडाळा, ठाणे भिवंडी कल्याण, गायमुख शिवाजी चौक मीरा रोड, वडाळा ते सीएसटी व कल्याण डोंबिवली तळोजा या प्रकल्पांचा यावर्षी शुभारंभ होईल. त्यादृष्टीने एमएमआरडीएने निधीचे नियोजन केले आहे.
अनेक मेट्रो प्रकल्पांसह शिवडी - न्हावाशेवा ट्रान्स हार्बर लिंक, विरार - अलिबाग कॉरिडॉर, मुंबई नागरी परिवहन विकास यांसारख्या प्रकल्पांना चालू वर्षात आणखी गती मिळणार आहे. यामध्ये मेट्रोच्या किमान दोन प्रकल्पांची कामे ८० ते ९० टक्के पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे एकूणच सर्व प्रकल्पांचा आवाका पाहता यंदाच्या वर्षी एमएमआरडीए प्रकल्पांवर जवळपास १६ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.