ताजी बातमी

घरगुती सिलिंडरचा स्फोट होऊन एकाच कुटुंबातीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हिंगोलीतील वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील ही घटना आहे.

2 मे मध्यरात्री झालेल्या गॅस सिलिंडरच्या स्फोटामध्ये दळवी कुटुंबीयांचं संपूर्ण घरच जळून खाक झालं. सोनाजी दळवी, सुरेखा दळवी, पूजा दळवी अशी मृतांची नावं आहेत. मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास सिलिंडरचा स्फोट झाला, यामध्ये संपूर्ण कुटुंबीयांचा जागीच मृत्यू झाला.

दळवी दाम्पत्याची मुलगी पूजा ही बीएचएमएसचं शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली आहे. ही दुर्घटना एवढी भीषण होती की, सिलिंडरच्या स्फोटामध्ये संपूर्ण घरच उद्ध्वस्त झालं आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात