ताजी बातमी

आयपीएल सामन्यांवर सट्टा घेणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी अटक केली. अटक आरोपींमध्ये एका विदेशी नागरिकाचा समावेश असून पोलिसांनी त्यांच्याकडून सट्टा घेण्यासाठी लागणारे साहित्य आणि रोकड हस्तगत केली.

आयपीएलमध्ये चेन्नई आणि दिल्ली या दोन संघांमध्ये बुधवारी सामना खेळविण्यात आला. या सामन्यात जुहू येथील झेड लक्झरी रेसिडेन्सी हॉटेलमधून काहीजण सट्टा घेत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट ला मिळाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आशा कोरके यांच्या पथकाने बुधवारी या हॉटेलच्या खोली क्रमांक ३०९ मध्ये छापा टाकला. मोबाइल आणि संकेतस्थळावरून सट्टा घेणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून सात मोबाइल, दोन लॅपटॉप, विविध बँकांचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड्स, भारतीय नोटा, अमेरिकन डॉलर्स, हाँगकाँग डॉलर्स तसेच इतर साहित्य हस्तगत केले. यामध्ये मोठे रॅकेट सक्रिय असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात