ताजी बातमी

मुंबई : महसूल संचालनालयाच्या अन्वेषण विभागाच्या पथकाने (डीआरआय) सोने तस्करी करणाऱ्यात्याटोळीकडून आणखी ७५ किलो सोने जप्त केले आहे. या प्रकरणातील मोहम्मद आसिफ कारतुकडी अब्बास मोहम्मद फासिल अबोबकर हे संशयित ४० किलो सोने घेऊन फरार झाले आहेत. ते केरळमार्गे दुबईला गेले असल्याचे विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यांच्या शोधासाठी केरळला पथक रवाना झाले असून यासंदर्भात देशातील सर्व विमानतळ प्राधिकरणाला सूचना (लूक आऊट नोटीस) बजावण्यात आली आहे.

डीआरआयने शुक्रवारी शोएब मोहम्मद आणि त्याचा मुलगा अब्दुल अहद यांना केरळ येथून अटक करून त्यांनी नऊ कारमध्ये लपवलेला २४ कोटी ६० लाख किमतीचा ऐवज जप्त केला. या टोळीतील मुख्य सुत्रधाराकडून २८ मार्चला डोंगरी परिसरातून ११० किलो सोने जप्त करण्यात आले होते. या प्रकरणी आतापर्यंत १२ जणांवर कारवाई करण्यात आली असून फरार कारतुकडी अबोबकर यांचा शोध सुरू आहे. कारतुकडी केरळ तर अबोबकरने दुबईला पळ काढल्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविण्यात आली. तस्करी करणाºया या टोळीचा मुख्य सूत्रधार निसार अलियार (४३) याचे ते भागीदार असून त्यांना ताब्यात घेण्यासाठी देशातील सर्व विमानतळ प्राधिकरणाला सूचना (लूक आऊट नोटीस) बजावण्यात आली आहे. या प्रकरणी आतापर्यंत एकूण १२ जणांना अटक झाली आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात