मुंबई: माटुंगा येथील बिग बाजारला भीषण आग
माटुंगा येथील बिग बाजारमध्ये भीषण आग लागली असून अग्निशमन दलाचे जवान पाच बंब व पाण्याचे तीन टँकर घेऊन तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग नियंत्रणात आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.
माटुंगा पश्चिम येथील तुळशी पाइप मार्गावर असलेल्या बिग बाजारमध्ये आज सायंकाळी ५ वाजून ७ मिनिटांनी आग लागली. याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीस, स्थानिक प्रभाग कार्यालयातील कर्मचारीही घटनास्थळी पोहचले आहेत.
बिग बाजारला लागूनच 'रिलायन्स ट्रेण्ड्ज' असून आग अधिक पसरू नये म्हणून सर्वतोपरी खबरदारी घेतली जात आहे.
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.