अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन विनयभंग केल्या प्रकरणी आरोपी सोमनाथ शिंदे रा आंबे यास सहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
आंबे तालुका पंढरपूर येथील आरोपी सोमनाथ रामचंद्र शिंदे याने दिनांक 26/1/2014 रोजी सकाळी 11 वाजता एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस दोषी धरून पंढरपूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री चकोर श्रीकृष्ण बाविस्कर साहेब यांनी आरोपीस सहा वर्षाची सक्तमजुरी व 15500/- रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के साहेब व त्यांचे दप्तरी पोलीस हवालदार सुरेश माळी यांनी केला. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट सारंग वांगीकर यांनी काम पाहिले तसेच पंढरपूर तालुका पोलीस ठाणे मार्फत पोहेकॉ शरणाप्पा किणगी हे कार्यरत होते.