बनावट 'जेमिनी' तेलाची विक्री
ज्या बनावट तेलउत्पादक कंपनीवर यापूर्वी अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली, त्याच कंपनीच्या भेसळयुक्त तेलाच्या पिशव्या दुकानात पुन्हा ग्राहकांच्या माथी मारल्या जात आहेत. मालाड पूर्व येथील लालानी ग्रॅन्जरमध्ये एम. एल सुपरमार्केटमध्ये अशा प्रकारच्या भेसळयुक्त तेलाच्या पिशव्यांची सर्रास विक्री होत होती. या प्रकारच्या पिशव्यांचा एक बॉक्स विक्रेत्याने विकल्याचे 'एफडीए'कडे मान्य केले. मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने अशाप्रकारच्या भेसळयुक्त तेलविक्रीला चाप लावणे गरजेचे असले तरीही निवडणुकांच्या कामामुळे या प्रक्रियेला किमान महिनाभराचा काळ लागेल, मालाड येथील लालानी ग्रॅन्जरमधील एम. एल सुपरमार्केट या विक्रेत्याने जेमिनी या ब्रँडशी साम्य असणाऱ्या खाद्यतेलाच्या बनावट पिशव्या विक्रीसाठी ठेवल्या होत्या. तक्रारदाराने पाच लिटर तेलाच्या पाच पिशव्या एकशे पंचवीस रुपये प्रतीलिटर या दराने विकत घेतल्या. या तेलाचा रंग आणि त्यातील जडत्व पाहून या तेलामध्ये भेसळअसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी या तेलाच्या पिशव्यांमध्ये भेसळ असल्याची शंका व्यक्त करून या पिशव्या दुकानदाराकडे परत पाठवल्या. कोणतीही खळखळ न करता दुकानदाराने त्या बदलूनही दिल्या