ताजी बातमी



गावी जाताना मेल-एक्स्प्रेसमध्ये कन्फर्म तिकीट मिळावे, यासाठी प्रवाशांकडून जादा पैसे उकळण्याचे प्रकार सर्रास घडतात. आरामदायी प्रवासाच्या आमिषाला बळी पडून अनेक प्रवाशांची फसवणूक झाल्याची तक्रार रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने होत असते. अशा तिकीट दलालांवर अंकुश ठेवण्यासाठी मध्य रेल्वेने ९९८७६४५३०७ या व्हॉट्सअॅप क्रमाकांची विशेष सेवा सुरू केली आहे. 

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने सुरू केलेल्या ९९८७६४५३०७ या व्हॉट्सअॅप क्रमाकांवर प्रवाशांना तिकीट दलालांची तक्रार करता येईल. ही तक्रार रेल्वे सुरक्षा बलाकडे पाठवण्यात येईल. तक्ररीची शहानिशा करून तात्काळ दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली. 

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात