ताजी बातमी

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) ग्राहकांना फेब्रुवारीपासून वाहिन्या निवडीचे स्वातंत्र्य दिले, परंतु त्याबाबत केबलचालक आणि डीटीएच चालकांचा उडालेला गोंधळ आणि मासिक शुल्कवाढ यामुळे ग्राहकांनीओव्हर टॉप प्लॅटफॉर्मना (ओटीटी)’ पसंती दिली आहे. चालू वर्षांतओटीटी प्लॅटफॉर्मची ग्राहकसंख्या दुप्पट झाली आहे.

नेटफ्लिक्स, ॅमेझॉन प्राईम व्हिडीयो, अल्ट बालाजी, हॉटस्टार, झी , वूट, हंगामा प्ले, टीव्हीएफ प्ले, इरॉस नाऊ, सोनी लिव्ह यासारख्या लोकप्रियओटीटी प्लॅटफॉर्मची ग्राहक संख्या वाढली आहे.

वाहिन्या निवडीचा हक्क मिळूनही केबलचालक आणि एमएसओ (मल्टी सिस्टीम ऑपरेटर्स) यांच्या आडमुठय़ा धोरणामुळे ग्राहकांना मासिक शुल्क वाढीची झळ सोसावी लागत आहे. तसेच आवडीच्या वाहिन्या निवडताना पर्याय मिळाल्यामुळे पुन्हा पॅकेजच घ्यावे लागत आहे. परिणामी, त्रासलेला ग्राहकओटीटीला पसंती देत आहे. म्हणूनचट्रायच्या नियम अंमलबजावणीतील गोंधळ कमी होईपर्यंत वाहिन्यांना मोठय़ा प्रमाणावर ग्राहकवर्गाला मुकावे लागणार आहे.

ट्रायच्या नव्या नियमावलीच्या अंमलबजावणीसाठी खूप वेळ लागत आहे. त्यामुळे काही ठिकाणी प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या वाहिन्या पाहता येत नाहीत. अशा ग्राहकांनीझी वर ऑनलाइन मालिका पाहायला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर ओटीटी प्लॅटफॉम्र्स ग्राहकांना त्यांच्या सोयीप्रमाणे सुविधा देत असल्यामुळे ते तिकडे आकर्षित होत असल्याचेझी५चे व्यवसायप्रमुख मनीष अग्रवाल यांनी सांगितले.

हंगामा प्लेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ रॉय म्हणाले, महिन्याला ६५ दशलक्ष (मिलियन) ग्राहकहंगामा प्लेवर कार्यक्रम पाहतात. त्याचबरोबर आमच्या नोंदणीकृत ग्राहकांमध्येही दुपटीने वाढ झाली आहे.

गेल्या वर्षभरात आणि २०१९ मधील जानेवारी ते मार्च दरम्यान ग्राहकसंख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे आम्ही ग्राहकांच्या सोयीसाठी आशय आणि मासिक शुल्कामध्ये विविध पर्याय उपलब्ध करून देत आहोत, असे अल्ट बालाजी या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या सूत्रांनी सांगितले. तसेच गेल्या काही माहिन्यांत वाढलेल्या ग्राहकसंख्येत प्रामुख्याने वाहिन्यांचा प्रेक्षकवर्ग असल्याचेवूटच्या सूत्रांनी सांगितले. एकंदरीतट्रायच्या नव्या नियमाचा फटका वाहिन्यांना बसला असून ग्राहकांनी त्यांच्या सोयीप्रमाणे आणि आवडीनुसार ओटीटी प्लॅटफॉर्मना पसंती दिली आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात